ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी बजावला मतदान हक्‍क

पोपटराव पवार, जिल्हाधिकारी द्विवेदी यांनीही केले मतदान
नगर जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 38.45 टक्के मतदान

नगर (प्रतिनिधी): राज्यातील विधानसभेसाठी मतदान सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी या मतदानावर पावसाचे संकट आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत 38.45 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. यात पुरूष 73,085 तर 49,979 एवढ्या महिला मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

अहमदनगर जिल्ह्यात अनेक मान्यवरांनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला. त्यातच राळेगणसिद्धी (पारनेर) येथे ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मतदानाचा हक्‍क बजावला. तर तिकडे आदर्श गाव योजनेचे प्रवर्तक पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारमध्ये मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शहरात आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला. दरम्यान यावेळी द्विवेदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच आज सकाळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह विविध मान्यवरांनी आपआपल्या मतदारसंघात मतदान केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.