दुपारी २ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के मतदान

मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

राज्य विधानसभेच्या 288 जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

– अभिनेत्री दीपिका पदुकोणने बजावला मतदानाचा हक्क 

– जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी केले मतदान 

– दुपारी २ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३०.८९ टक्के मतदान.

– पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांनी आपल्या पत्नी माधुरी शिरोळे यांच्या बरोबर आपटे रस्त्यावरील आंध्र स्कूल येथे मतदान करित आपला मतदानाचा हक्क बजावला. 

– अभिनेता हृतिक रोशनने केले मतदान. 

– ड्रिमगर्ल हेमा मालिनीने बजावला मतदानाचा हक्क 

– केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले मतदान

– राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क. यावेळी त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. 

– अभिनेता गोविंदा यांनी सपत्नीक केले मतदान 

– शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क 

– मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहकुटुंब केले मतदान 

– खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, आमदार भीमराव तापकीर यांनी धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्यामंदीर येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

– भाजप खासदार गिरीश बापट यांनी सहकुटुंब मतदान केले. 

– मनसेचे अधिकृत उमेदवार किशोर शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क. 

– पर्वती मतदारसंघातील उमेदवार माधुरी मिसाळ यांचे सहकुंटुब मतदान.

– पुणे : मुंढवा येथील राजश्री शाहू विद्यालयात बोगस वोटिंग; नागरिकांचा संताप.

– रमेश बागवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. 

– वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केले मतदान.

– सकाळी १० वाजेपर्यंत हरियाणात ८.९२ टक्के तर महाराष्ट्रात ५.७७ टक्के मतदान.

– पुणे : शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज गायब आहे. अशातच मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.

– रितेश देशमुखचे सहकुटुंब मतदान.

– अभिनेत्री माधुरी दीक्षितने केले मतदान

– आकुर्डी येथे सरस्वती शाळेत अर्धा तासापासून ईव्हीएम मशिन तांत्रिक बिघाडामुळे बंद

– सकाळी 9 पर्यंत पुणे स्थिती

– सकाळी 9 पर्यंत हडपसरमध्ये सर्वाधिक 8 टक्के तर कॅन्टोन्मेंट मध्ये 3.15 टक्के सर्वात कमी मतदान

– राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार कॅम्पेनर, खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.

– कै. वसंतराव टिंगरे विद्यालय येथे मतदान केंद्रात चिखलात फळ्या टाकून केली मतदानाची सोय. ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी केली मदत.

 

 

– माजी टेनिस खेळाडू भूपती आणि अभिनेत्री लारा दत्ताने केले मतदान.

– अभिनेता आमिर खानने बजावला मतदानाचा हक्क.

– दिव्यांगांचाही मतदानास मोठा प्रतिसाद. 

– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आणि काँग्रेसची अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सहपरिवार मतदान केले. 

– पद्मिनी कोल्हापुरे आणि अभिनेता व भाजप आमदार रवी किशन यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

– निवडणूक केंद्रांवर पुणे महापालिकेचा “सेल्फी स्पॉट’ 

– आमदार जगदीश मुळीक यांनी सहकुटुंब मतदान केले.

– पुणे : वडगावशेरी मतदार संघातील धानोरी येथील बाबूराव टिंगरे शाळेतील इव्हीएम पडले बंद. मतदारांना मनस्ताप. 

– मनपा आयुक्त सौरभ राव व त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी मतदानाचा हक्क बजावला

– राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी आपला मतदानाच हक्क बजावला. 

– शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघाचे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अॅड. अशोक रावसाहेब पवार व त्यांच्या धर्मपत्नी सहपरिवार मतदानाचा अधिकार बजावला.

– राज्याचे जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी अल्पबचत भवन यांनी सपत्नीक मतदान केले. 

– अल्पबचत भवन येथे शहराचे पोलिस आयुक्त के वेंकटेशन यांनी सकाळी 7 वाजून पाच मिनिटांनी मतदान केले. 

– पुण्यातील कोथरूडमध्ये पहिल्या 2 तासात सर्वाधिक 5 टक्के मतदान झाले आहे. 

–  पुण्याच्या महापौर व कसबा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांचे सहपरिवार मतदान.

– सकाळी 9 पर्यंत  पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये 2.5 टक्के मतदान

– पावसाची विश्रांती; मात्र, मतदाराचा प्रतिसादही कमी

– राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान केले.

– नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आपला मतदानाचा हक्क पार पाडला.

– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

– मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रूबेरो यांनी मतदान केले.

– सरसंघचलाक मोहन भागवत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपूर मध्य मतदारसंघात सकाळी सात वाजता त्यांनी मतदान केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.