शिरूर -शिरूर शहरातील श्री हाइट्स सोसायटी व मंगलमूर्तीनगर येथील साई रो हाऊसिंग सोसायटीने आपापल्या सोसायट्यांमध्ये स्वखर्चाने अत्याधुनिक ऑटो सॅनिटायझर मशीन बनवले आहे. शिरूर शहरातील रामलिंग रोडवरील श्री हाईट्स सोसायटीमध्ये सर्व प्रथम ऑटो सॅनिटायझर मशीन बनवण्यात आली आहेत.
भुजंगराव तनपुरे यांच्या कल्पनेतून व हैयास शेख, इसाक शेख, रवींद्र गुळादे, भावेश शाहा, अतुल लुंकड, दीपक नाना फलके, महेश बाफना, राजेंद्र महाजन, सुनील शर्मा, नवनाथ दंडवते, जावेद शेख यांच्या सहकार्याने बनविण्यात आले आहे.
यावेळी शिरूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे, शिरूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक भगवानराव पालवे, मंडलधिकारी निलेश घोडके, श्री हाईट्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बाबूशेठ खाबिया, अध्यक्ष मोहन चिखले उपस्थित होते.
साई रो हाऊस सोसायटी, मंगलमूर्ती नगर यांनी स्वखर्चाने टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ सॅनिटायझर फवारणी यंत्र निर्माण केले.
याला प्रत्यक्ष भेट देऊन त्याची पाहणी केली. प्रत्येक भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने असे उपक्रम आपल्या सोसायटी व आपल्या परिसरात बसविले पाहिजे, असे आवाहन शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले.