पुणे – शहरात मोठया प्रमाणावर राजस्थानी समाज स्थलांतरित झालेला आहे. या समाजाने स्वतःच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघाची स्थापना केली आहे. या संघाच्या प्रथम अध्यक्षपदी महेश नागरी मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक मगराज राठी यांची निवड करण्यात आली. राजस्थानी महोत्सवाच्या या कार्यक्रमात राजस्थानी समाजाकडून सर्वानुमते ही नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीची घोषणा हरीश सोनी यांनी केली.
सर्व राजस्थानी समाजातील लोकांना या संस्थेच्या माध्यामातून एकाच छताखाली आणने हाच या मागचा उद्देश आहे. या संस्थेचा माध्यामातून जवळपास २०००० लोकांना सभासद करून घेणे व संस्थेद्वारे समाजातील विविध घटकांच्या अडचणी सोडविणे व त्यांना योग्य मार्गदर्शन करणे व तसेच संस्थेचा मुख्य संकल्प पुण्यामध्ये राजस्थानी समाजासाठी प्रशस्त असे ‘राजस्थानी भवन” निर्माण करणे ही माझी पहिल्या वर्षाचे उद्दिष्ठे असेल असे संस्थेचे नुतन अध्यक्ष मगराज राठी यांनी सांगितले हे राजस्थानी भवन उभारून समाजभूषण स्व. धनराजजी राठी यांचे स्वप्न लवकरच पुर्ण करण्याचा मानस आहे असा मनोदय मगराज राठी यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या वेळी राजस्थानमधील जाट समाजाकडून मंगलदास चौधरी, सिरवी समाजाकडून चंदालाल भयाल, देवराम धर्मावत यांनी राठी यांचे राजस्थानी पगडी घालून स्वागत केले. यावेळी आमदार माधूरी मिसाळ, रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, सहकार आयुक्त अनिल कवडे, राजेश राठी, सत्यनारायणजी जोशी हे मुख्य पाहुणे उपस्थित होते.
या प्रसंगी सुरेश धर्मावत, उमेश चौधरी, धनराज भाटी, हरीश वर्मा, ओमप्रकाश चौधरी, घिसूलाल सुथार, कानाराम चौधरी, रतनलाल कासा, वजाराम बडवाल, केसाराम कुमावत, भेराराम जाट, सुखदेव चारण आदींनी यावेळी राठींचे अभिनंदन केले.