Urfi Javed – उर्फी जावेदसाठी (Urfi Javed) तिच्या फॅशनमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे ही काही नवीन गोष्ट नाही. फॅशन सेन्सेशन बनलेली उर्फी (Urfi Javed) नेहमीच तिच्या रंगीबेरंगी आणि अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असते. तिच्या हटके लूक मधील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
आणि त्यामुळेच अनेकदा ती नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील होत असते. नुकतंच उर्फीचा नवीन लूक समोर आला असून, यामध्ये तिने चक्क ड्रेससोबतच अजून एक सेम ड्रेस जोडला आहे. तिचा हा अतरंगी लूक पाहून लोकांनी थेट डोक्याला हात लावल्याचे बघायला मिळाले.
उर्फी जावेद (Urfi Javed) ही बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसलीये. मात्र, या ड्रेससोबतच उर्फी जावेद हिने अजून एक सेम ड्रेस जोडला आहे. उर्फी जावेद हिचा हा ड्रेस पाहून लोक हैराण झाले. उर्फी जावेद हिचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.