पाटणा – बिहार स्टेट पॉवर (होल्डिंग) कंपनी लिमिटेडच्या 11 व्या स्थापना दिनानिमित्त बिहार मध्ये 14,000 कोटी रुपयांच्या वीज प्रकल्पांना प्रारंभ करण्यात आला आहे. त्या कामांचे उद्घाटन आज मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की एखाद्या सरकारने सुरू केलेले चांगले काम हे एखाद्या पक्षाचे काम किंवा योगदान नसते तर ते पुर्ण सरकारचे योगदान असते. त्यामुळे अशा कामाचे पक्षीय क्रेडीट घेण्याचा प्रयत्न होता कामा नये अशी सुचना त्यांनी यावेळी बोलताना केली.
यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी आपापल्या पक्षांची प्रतिमा उंचावण्यासाठी सरकारच्या उपलब्धींचा वापर केल्याबद्दल नापसंती व्यक्त केली.जेडीयु पक्षाचे उर्जा मंत्री बिजेंद्र यादव आणि महसुल आणि जमीन सुधारणांचे प्रमुख पोर्टफोलिओ असलेले राजदचे नेते आलोक मेहता या समारंभाला उपस्थित होते.
कुमार म्हणाले, “माझ्या लक्षात आले आहे की, माझे अनेक मंत्री हेडलाइन मिळवण्याच्या प्रयत्नात सरकारच्या चांगल्या कामाचे श्रेय त्यांच्याच पक्षांना देतात हे योग्य नाही.जेव्हा मी बिहारमध्ये केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचा उल्लेख करतो तेव्हा मी ते माझे वैयक्तिक कर्तृत्व म्हणून बोलत नाही.
त्याचप्रमाणे, सर्व मंत्र्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी अशा कामांचे श्रेय संपूर्णपणे सरकारला दिले पाहिजे. आपल्या भाषणात, नितीशकुमार यांनी त्यांचे सर्वात ज्येष्ठ मंत्री बिजेंद्र यादव यांची देखील जोरदार प्रशंसा केली, ज्यांनी जवळपास दोन दशके सत्तेत मंत्रिपद सांभाळले आहे.त्यांनी राज्यातील वीजेच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा केली आहे असे ते म्हणाले.