जालना – “माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर मी स्वतः या राजकीय नेत्यांना घरात घुसून त्यांना मारेन” असा इशारा मनोज जरांगे पाटील (manoj Jarange Patil) यांच्या लेकिन दिला आहे.एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जरांगे पाटील यांच्या मुलीने आपल्या वडिलांच्या लढ्याबाबत भाष्य केले.जरांगे पाटलांच्या चिमुकल्या लेकीनं देखील यावेळी आपल्या वडिलांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आक्रमक भूमिका मांडली. (Manoj Jarang patil daughter)
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. राज्यभरातून त्यांच्या या आंदोलनाला आक्रमक पद्धतीने मराठा बांधावांचा पाठिंबा मिळताना दिसतोय. त्याच पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली.जरांगे पाटील मात्र आपल्या उपोषणावर ठाम असल्याचे समजते. अशात जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्या मुलीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
सरकारने काही ठोस निर्णय न घेतल्यास जल त्याग करण्याचा इशारा काल जरांगे पाटील यांनी दिला होता. अशात आता त्यांच्या लेकीनं देखील आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. “आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न केल्यास ते पुन्हा जलत्याग करणार आहेत. हे या सरकारला कळायला नको का ?” असा सवाल जरांगे यांच्या लेकीनं उपस्थित केला आहे.
“मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर सरकार का काढत नाही ? आता माझ्या वडिलांच्या जीवाला काही झालं, तर एक मुलगी म्हणून सांगते की, मी स्वतः या राजकीय नेत्यांना घरात घुसून मारेन” अशी आक्रमक भूमिका यावेळी जरांगेच्या मुलीनं मांडली.