श्रीनगर: सीआरपीएफचा एक जवान आणि एका सहा वर्षाच्या लहान बालकाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे.
श्रीनगर शहरातील मलबाग भागात आज झालेल्या चकमकीत या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. जहीद दास असे या दहशतवाद्याचे नाव आहे, तो जम्मू काश्मीर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी काम करीत होता.
बंदीपोऱ्यात 26 जून रोजी सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात त्याचा हात होता. त्या हल्ल्यात एका बालकासह एका जवानाचा मृत्यू झाला होता.
हा दहशतवादी मलबाग भागात आपल्या सहकाऱ्यांसह लपला असल्याची माहिती मिळाल्यावरून जवानांनी त्या भागाची नाकेबंदी केली होती. त्यात तो मारला गेला. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.