सेक्रेड गेम्स-2 चा दुसरा टीझर प्रदर्शित

वेब सीरिजच्या विश्वातील सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षकांना सर्वात जास्त प्रतिक्षा होती मात्र, त्यांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या भागाचा दुसरा टीझर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या सीजनमध्ये होते त्याचप्रमाणे दुसऱ्या भागातही अनेक ट्विस्ट आणि टर्न असणार आहेत. नव्या सीजनमध्ये नवे खेळाडू, नवे चेहरे दिसणार असून गणेश गायतोंडे म्हणजे नवाजुद्दीनही वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. पहिल्या भागात मुंबईला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारा सरताज सिंग (सैफ अली खान) पुन्हा एकदा नव्याने कोडी उलगडताना दिसणार आहे.

पहिल्या सीजनमध्ये गणेश गायतोंडे हा सरताज सिंगला फोन करुन मुंबई वाचवण्यासाठी तुझ्याकडे फक्त 25 दिवस आहेत अशी चेतावणी देतो. त्रिवेदी सोडून कोणीही वाचणार नाही हा पहिल्या सीजनमधील मुख्य भाग होता. दरम्यान सिक्रेड गेम्सचा दुसरा टिझर रिलीज करण्यात आला असून यामध्ये यावेळी त्रिवेदीही वाचणार नाही असे सांगण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा वाढली असून यावेळी काही अनपेक्षित गोष्टी पहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिल्या टिजरमध्ये वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नेटफ्लिक्‍सच्या अधिकृत अकाऊंटवर सेक्रेड गेम्स चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.