मेंढार/जम्मू, – जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर सुरक्षा दलांनी शनिवारी त्या भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. सकाळी 6 च्या सुमारास बुफ्लाझ सेक्टरमधील चामरेर आणि गंगना टॉपमध्ये लष्कर आणि पोलिसांनी ही संयुक्त शोध मोहीम सुरू केली.
काही संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर शोध पक्षांनी चामरेर जंगल परिसरात काही गोळीबाराच्या फैरी झाडल्या परंतु दुसऱ्या बाजूने कोणताही प्रत्युत्तर मिळाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातून काही घुसखोरांना भारतीय हद्दीत पाठवण्यात आल्याच्या घटना या आधी घडल्या आहेत.
पुन्हा असाच प्रकार तेथे करण्यात येत असल्याचा संशय असल्याने या भागात कडक पहारा आणि बंदोबस्तही ठेवला गेला आहे. लष्कर आणि पोलिस यांनी सध्या घुसखोरीचे कोणतेही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी अधिक सतर्कतेने कार्यरत आहेत.