Infiltration on LOC : लष्करानेजम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता, जो भारतीय लष्कराने धुळीस मिळवला आहे. लष्कराच्या जवानांनी चार घुसखोरांना पाहिल्यानंतर त्याठिकाणी गोळीबार करण्यात आला ज्यामध्ये एक घुसखोरही ठार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घुसखोरांना पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा मिळत होता. हे घुसखोर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात घुसण्याच्या प्रयत्नात होते. त्याचवेळी भारतीय जवानांचे लक्ष वळवण्यासाठी पाकिस्तानी लष्करानेही त्यांच्या एका चौकीला आग लावली. मात्र, पाकिस्तानचा हा डाव यशस्वी झाला नाही आणि जवानांनी लगेचच घुसखोरांवर गोळीबार सुरू केला, ज्यात एक घुसखोर मारला गेला.
अधिकाऱ्यांनीही घुसखोरीला दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांनी आज पहाटे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे म्हटले आहे. “अखनूर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून जड शस्त्रांनी सज्ज चार दहशतवादी या बाजूने येताना दिसले. त्यानंतर सैनिकांनी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांवर गोळीबार केला, ज्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याला गोळी लागली आणि तो जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाला..” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह त्याच्या साथीदारांनी आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलीकडे ओढून नेला होता. हे दहशतवादी रात्रीच्या अंधारात टेहळणी यंत्राद्वारे घुसखोरी करताना दिसले. भारताची पाकिस्तानशी गुजरात ते जम्मूपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा आहे. मात्र, जम्मूपासून पुढे जाताच काश्मीरमधून नियंत्रण रेषा (LOC) सुरू होते.
दरम्यान,जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. हल्ल्याच्या ठिकाणाहून तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत, ज्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लष्कराच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले. ज्या लोकांचे मृतदेह आढळून आले त्यात पोलिसांनी ज्यांना चौकशीसाठी नेले होते.