फलटण, (प्रतिनिधी) – महात्मा शिक्षण संस्था संचलित मतिमंद मुलांच्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, डॉ. हेमलता गुळवणी, धर्मेंद्र भल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ जोशी म्हणाले की, अशा मुलांना सांभाळणे शिकवणे हे खूप अवघड काम आहे हे पवित्र कार्य आपण व आपले शिक्षक करत आहात त्या सर्वांना मी धन्यवाद देतो .
कार्यक्रमासाठी उज्वला निंबाळकर, सुनिता कदम, निलम देशमुख भल्ला, दिलीपशेठ अग्रवाल, महेश जगताप, सुभाष मुळीक हे उपस्थित होते. मतिमंद विद्यार्थांनी सादर केलेले नृत्य आणि नाटक पाहुन उपस्थित सर्व पालक आणि पाहुणे भारावून गेले.
संस्थेचे अध्यक्ष संदीप चोरमले यांनी प्रास्तविकामध्ये शाळेविषयी सविस्तर माहिती सांगून शाळेतील शिक्षक आणि सेवक वर्ग यांनी केलेल्या वर्षभरातील कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमास रमेश लालसरे, सुनिता गायकवाड, गिरणा पवार, राधिका माळवे, अमोल राऊत, वंदना धाराशिवकर, प्राची जवस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक अमित राऊत यांनी आभार मानले .