मायणी, (प्रतिनिधी) – असंख्य भाविकांच्या उपस्थितीत व यशवंत बाबा महाराज की जयच्या घोषात मायणी, ता. खटाव येथील संत श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांच्या ९३ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित रथोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
रथापुढे बँड पथक, भजनी मंडळ, यशवंत बाबांच्या पादुका असलेली पालखी ठेवण्यात आली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी रथ थांबवून भाविक दर्शन घेत होते व एक रुपयापासून हजार रुपयांची देणगी रथावर अर्पण करताना दिसत होते.
यशवंत बाबा मंदिरासमोर आकर्षक अशा फुलांनी सजावट करून रथ ठेवण्यात आला होता. सकाळी ११ वाजता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, यांच्या हस्ते व माजी जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे, शोभना गुदगे, अनिल देसाई, रणजितसिंह देशमुख, संदीप मांडवे, प्रा बंडा गोडसे, मोहन बुधे,अर्जुन वलेकर, अनिल पवार, महादेव माने, चंद्रकांत पवार, सदाशिव खाडे,
गणेश गोडसे, श्रीकांत काळे, अभय देशमुख, गिरीश शहा, शैलेंद्र वाघमारे, स्वप्निल घाडगे, संकेत महामने, विकास साबळे, बाळासाहेब पाटील, तानाजी देशमुख, शरदराव खाडे, शशिकांत मोरे, काकासाहेब पवार, राजू जुगदर, संतोष जाधव, अनिल माळी,
सरपंच सोनाली माने, उपसरपंच दादासाहेब कचरे, रित्विक गुदगे सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी पदाधिकारी, अर्बन बँकेचे पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते,ग्रामस्थ व भाविक यांच्या उपस्थितीत रथपूजन होऊन रथोत्सवास प्रारंभ झाला.
मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी
सकाळपासूनच भाविकांची श्री यशवंत बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यानिमित्ताने आयोजित खंडोबा माळ परिसरात विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. तेथेही नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती . रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रथ ग्राम प्रदक्षिणा करून मंदिरात आल्यानंतर पोलीस संरक्षणात रथावरील नोटा काढण्यात आल्यानंतर मायणी अर्बन बँकेच्या कार्यालयात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी रथावरील रकमेची मोजदाद केली.