नवी दिल्ली ( SC on NSA against SP Leader ) – उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते युसुफ मलिक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली करण्यात आलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाने साफ फेटाळून लावली असून त्यांच्यावर अशा स्वरूपाची विधीनिषेधशुन्य कारवाई केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत.
त्यांना त्वरीत सोडून देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. वास्तविक युसुफ मलिक यांचे मूळ प्रकरण महसुल थकबाकीचे आहेत. त्यांच्यावर भाजप सरकारने रासुकाची कारवाई केली आहे. आपल्याला खोटेपणाने अडकवून विनाकारण कारागृहात डांबले आहे असा आरोप युसुफ मलिक यांनी करीत या कारवाईच्या विरोधात सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.
अमित शाहांच्या भेटीनंतर आशिष शेलार म्हणाले,’चंद्रकांत पाटलांना ते वक्तव्य टाळता आलं असतं’
हे रासुकाचे प्रकरण आहे का? अशी कडक शब्दातील विचारणा कोर्टाने सरकारी वकिलांना केली. त्यामुळे ही केवळ राजकीय सूड बुद्धीने करण्यात आलेली कारवाई वाटत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. डोक्याचा वापर न करता केली गेलेली ही कारवाई आहे असेही कोर्टाने म्हटले आहे.
अजित पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं कोड्यात उत्तर…
आपल्या अधिकार क्षेत्रात नसलेल्या अधिकाराचाही यात वापर केला गेला आहे असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. त्यामुळे रासुका खाली करण्यात आलेली कारवाई रद्द करून त्यांची त्वरीत सुटका करावी असे आदेश आम्ही देत आहोत असे कोर्टाने म्हटले आहे. ( SC on NSA against SP Leader )