Ajit Pawar ED clean cheat – भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. सोमय्या यांनीच जरंडेश्वर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडीने देखील तातडीने कारवाई करत धाड सत्र सुरु केलं होत. अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींवर धाडी घालण्यात आल्याने ईडीच्या रडारावर आता अजित पवार असल्याचं बोललं जात होत. मात्र ईडीने याबाबतच्या आरोपपत्रात अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा उल्लेख केला नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे ईडीने अजित पवार यांना क्लीनचिट दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार यांची पाहिली प्रतिक्रिया…
ईडीने क्लीनचिट दिल्याच्या चर्चांवर बोलताना अजित पवार यांनी, “मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीनचिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही. ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही. ही बातमी कशाच्या आधारे दिली हे मला कळायला मार्ग नाही, पण मी सर्वांना स्पष्ट सांगू इच्छितो की, अशाप्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सोमय्यांचे आरोप । Ajit Pawar ED clean cheat
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, जरंडेश्वर साखर करण्यात करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. सोमय्या यांच्या आरोपांची सुई अजित पवार यांच्याकडे असल्याने या प्रकरणात पुढे काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अशातच आता ईडीच्या आरोपपत्रातून अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे नावाचं गायब असल्याने सोमय्यांनी केलेल्या आरोपांचे काय असा प्रश्न उपस्थित होतोय.
उद्धव ठाकरे – शरद पवारांच्या भेटीवर भाष्य
ठाकरे गराचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकला पोहोचले होते. पवार ठाकरे यांच्या या भेटीबाबत विचारले असता अजित पवार यांनी, या भेटीचा नेमका तपशील माहिती नाही मात्र १ मे रोजी मुंबईच्या बीकेसी मैदानात होणाऱ्या स्बभेविषयी चर्चा झाल्याचे माहीत असल्याचे त्यांनी सांगितले.