बेळगावी ( Karnatak Vidhansabha Election ) – भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. त्यात अनेक आमदारांना तिकिटे नाकारण्यात आल्याने भाजपमध्ये एकदमच नाराजी उफाळून आली आहे. यातूनच माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आज भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.
माजी मुख्यमंत्री जगदीश खट्टर यांचेही तिकीट नाकारण्यात आल्याने तेही नाराज आहेत. तेही दिल्लीला पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी गेले आहेत. सवदी हे अथणीचे तीन वेळा आमदार आहेत, पण 2018 च्या निवडणुकीत कुमथल्ली (तेव्हा कॉंग्रेसमध्ये) मधून त्यांचा पराभव झाला होता.
यावेळीही त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे त्यामुळे त्यांनी पक्षच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय आपण उद्या घेऊ, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
माजी मुख्यमंत्री जगदीश खट्टर यांचेही तिकीट कापण्यात आले आहे. ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. खट्टर म्हणाले की, आपण आजच दिल्लीत नढ्ढा यांना भेटण्यासाठी जात आहोत आणि त्यावेळी सगळे सुरळीत होईल, अशी आपल्याला आशा आहे. ( Karnatak Vidhansabha Election )