आळेफाटा – पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील सुभाष विद्या मंदिरातील सवंगडी तब्बल 47 वर्षांनंतर एकत्र आले आणि शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
यावेळी निवृत्त क्रीडा शिक्षक के. एन. रोडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांची परेड घेतली व त्यानंतर राष्ट्रगीत व स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. या स्नेहमेळाव्याचा शुभारंभ ज्येष्ठ शिक्षक पी. जी. कोल्हे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद लेंडे, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब काकडे, ज्येष्ठ साहित्यिक व उत्तम कविता रचनाकार इंजिनिअर शिवाजीराव चाळक यांनी केले.
शरद लेंडे, समाजाभिमुख उद्योजक बाळासाहेब काकडे, कृषी शिक्षण भूषण प्राचार्य डॉ. सूर्या गुंजाळ, कृतिशील कृषीनिष्ठ शेतकरी प्रकाश वाघ या माजी विद्यार्थ्यांन त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले.