केपटाउन : दक्षिण आफ्रिका-इंग्लंडदरम्यानच्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यास न्यूलँन्डस येथे आजपासून सुरूवात झाली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ८९ षटकांत ९ बाद २६२ पर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जेम्स अँडरसन ३ तर आॅली पोप ५६ धावांवर खेळत होता.
STUMPS DAY 1 | ENG 263/9
🔴Pretorius 11 Overs, 2/26
🔴Philander 16 Overs, 2/46
🔴Maharaj 27 Overs, 1/68
🔴Rabada 18 Overs, 2/63
🔴Nortje 17 Overs, 2/54
🚫Extras 6Pope is still there giving England Hope, but how long can he and Anderson last in the morning.#ProteaFire#SAvENG pic.twitter.com/Vf0arB2K7i
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 3, 2020
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर जक क्राॅल यास ४ धावांवर फिलेंडरने क्विंटन डी काॅककरवी झेलबाद करत इंग्लंड संघास पहिला झटका दिला. तेव्हा त्यांची धावसंख्या ८ अशी होती. त्यानंतर डोमिनिक सिबली आणि जो डेनली यांनी डाव सावरत दुस-या विकेटसाठी ५५ धावा तर जो रूट आणि जो डेनली तिस-या विकेटसाठी ४२ धावा जोडल्या. सिबली ३४ तर जो रूट ३५ धावांवर बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या १२७ असताना जो डेनलीला ३८ धावांवर केशव महाराजने त्रिफळाचित करत इंग्लंड संघास चौथा धक्का दिला. त्यानंतर आॅली पोप आणि बेन स्टोक्सने सावध खेळ करत पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागिदारी केली. बेन स्टोक्स ४७ धावांवर बाद झाला. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या १८५ अशी होती.
त्यानंतर ठराविक धावसंख्येच्या अंतरावर इंग्लंडचे फलंदाज बाद झाले. जोस बटलर २९, सॅम करन ९, डोमनिक बेस ०, स्टुअर्ट ब्राॅड १ धावांवर बाद झाला. संघाची धावसंख्या ९ बाद २३४ असताना अँडरसन आणि आॅली पोप यांनी आणखी पडझड होऊ न देता संघाची धावसंख्या ९ बाद २६२ पर्यंत नेली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत वरनॉन फ़िलेंडर, कगिसो रबाडा, ऐनरिक नॉर्टजे, ड्वेन प्रीटोरियस यांनी प्रत्येकी २ तर केशव महाराजने १ गडी बाद केला.