बंगळुरू – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान कर्नाटकचा पराभव करत सौराष्ट्रने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता विजेतेपदासाठी त्यांची बंगालशी लढत रंगणार आहे. अंतिम लढत येत्या 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.
Saurashtra Won by 4 Wicket(s) (Qualified) #KARvSAU #RanjiTrophy #SF2 Scorecard:https://t.co/8OeQkBMTBX
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 12, 2023
या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कर्नाटकने आपल्या पहिल्या डावात 407 धावा केल्या. त्यात मयंक आग्रवालने 249 धावांची खेळी केली होती. सौराष्ट्रकडून चेतन सकारीया व कुशांग पटेल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. याला चोख प्रत्युत्तर देताना सौराष्ट्रने आपल्या पहिल्या डावात 527 धावांचा डोगर उभारला. त्यात अर्पित वासवदाने द्विशतक (202) तर शेल्डन जॅक्सनने दीडशतक (160) फटकावले. कर्नाटककडून विध्वत कावेरप्पाने 5 गडी बाद केले. त्यानंतर सौराष्ट्रने कर्नाटकचा दुसरा डाव 234 धावांवर संपुष्टात आणला.
कर्नाटकच्या निकिन जोन्सने शतकी (109) खेळी केली. सौराष्ट्रच्या चेतन सकारीया व धर्मेंद्रसिंग जडेजा यांनी प्रत्येकी 4 गडी बाद केले. त्यानंतर विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या सौराष्ट्रने 34.2 षटकांत 6 गडी गमावून 117 धावा करत निर्णायक विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.
Ranji Trophy 2023 #SF1 : बंगाल अंतिम फेरीत; मध्य प्रदेशविरुद्ध 306 धावांनी निर्णायक विजय
सौराष्ट्रच्या पहिल्या डावातील द्विशतकवीर वासवदाने दुसऱ्या डावात नाबाद 47 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला. त्याला साथ देताना चेतन सकारी याने 24 धावांची खेळी केली. कर्नाटककडून वासुकी कौशिक व कृष्णाप्पा गौतम यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले मात्र, ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. सौराष्ट्रचा अर्पित वासवदा सामन्याचा मानकरी ठरला.