केपटाऊन – महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान महिला संघाचा 7 गडी राखून पराभव केला व स्पर्धेत विजयी सलामी दिली. या लढतीत पाकिस्तान महिला संघाने मर्यादीत 20 षटकांत 4 बाद 149 धावा केल्या होत्या. याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने 19 षटकांत 3 गडी गमावून 151 धावा करत विजय साकार केला.
.@JemiRodrigues scored a stunning 5⃣3⃣* in the chase & bagged the Player of the Match award as #TeamIndia commenced their #T20WorldCup campaign with a win over Pakistan 🙌 👏
Scorecard ▶️ https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK pic.twitter.com/JvwfFtMkRg
— BCCI Women (@BCCIWomen) February 12, 2023
विजयासाठी 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर यस्तीका भाटीया व स्टार फलंदाज शफाली वर्माने 38 धावांची सलामी दिली. यस्तीका 17 धावांवर बाद झाल्यावर शफालीही वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 33 धावांवर परतली. तीने 25 चेंडूत 4 चौकार फटकावले.
शफाली बाद झाल्यावर आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरनेही निराशा केली. 16 धावांवर बाद झाली. त्यानंतर जेमिमा रॉड्रीक्स व रिचा घोष ही जोडी चांगली जमली व त्यांनी संघाचे शतक फलकावर लावले. जेमिमाने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाचा विजय साकार केला. तीला साथ देताना घोषने नाबाद 31 धावांची खेळी केली. जेमिमाने नाबाद 53 धावा करताना 38 चेंडूत 8 चौकार फटकावले. घोषने नाबाद 31 धावा करताना 20 चेंडूत 5 चौकार फटकावले. पाकिस्तानकडून नशरा संधूने 2 बळी घेतले.
Innings Break!
2️⃣ wickets for @Radhay_21
1️⃣ wicket each for @Vastrakarp25 & @Deepti_Sharma06Target 🎯 for #TeamIndia – 150
Scorecard ▶️ https://t.co/OyRDtC9SWK #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/jKpoBSCA9j
— BCCI Women (@BCCIWomen) February 12, 2023
तत्पूर्वी, पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिस्माहने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय महिला संघातील गोलंदाजांनी तीचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरवला. दीप्ती शर्माने पाकिस्तानची सलामीवीर जवेरीया खानला 8 धावांवर बाद करत थाटात सुरुवात केली. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज मुनीबा अली 12 धावांवर राधा यादवच्या गोलंदाजीवर यष्टिचित बाद झाली. त्यानंतर निदा दरनेही निराशा केली. एका बाजूने कर्णधार बिस्माह चांगलीच लढत देत होती. तीच्यासह खेळत असलेल्या सिद्रा आमिन 11 धावांवर परतली. यावेळी त्यांची 4 बाद 68 अशी बिकट स्थिती बनली होती. मात्र, आयेशा नसिमने परिस्थिती ओळखून फलंदाजी केली व बिस्माहला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले.
बिस्माहने स्थिरावल्यावर चांगली फटकेबाजी केली. आयेशानेही चौकार व षटकारांची आक्रमकता दाखवली. बिस्माहने आपले अर्धशतक पूर्ण केले. यावेळी आयेशाने वेगाने धावा जमवल्या. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 81 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली व संघाला 20 षटकांत 4 बाद 149 अशी समाधानकारक मजल मारुन दिली.
बिस्माहने नाबाद 68 धावांची खेळी करताना 55 चेंडूत चौकार फटकावले. आयेशाने नाबाद 43 धावा करताना 25 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली. भारतीय संघाकडून राधा यादवने 2 गडी बाद केले. तीला साथ देताना दीप्ती शर्मा व पुजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
धावफलक –
पाकिस्तान महिला संघ – 20 षटकांत 4 बाद 149 धावा. (बिस्माह महारुफ नाबाद 68, आयेशा नसिम नाबाद 43, राधा यादव 2-21).
भारतीय महिला संघ – 19 षटकांत 3 बाद 151 धावा. (शफाली वर्मा 33, जेमिमा रॉड्रीक्स नाबाद 53, रिचा घोष नाबाद 31, नशरा संधू 2-15).