इंदूर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत बंगालने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात बंगालने मध्य प्रदेशवर 307 धावांनी निर्णायक विजय मिळवला.
बंगालने पहिल्या डावात 438 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर मध्य प्रदेशचा पहिला डाव 170 धावांत गुंडळला व 268 धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर बंगालने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद 279 धावा केल्या व मध्य प्रदेशसमोर निर्णायक विजयासाठी 548 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानासमोर मध्य प्रदेशचा दुसरा डाव 241 धावांवर संपला व बंगालने 306 धावांनी मोठा विजय प्राप्त केला.
𝙄𝙣𝙩𝙤 𝙩𝙝𝙚 𝙁𝙞𝙣𝙖𝙡𝙨! 👏🏻👏🏻
Bengal register a 306-run victory over Madhya Pradesh in #SF1 of the @mastercardindia #RanjiTrophy and seal their position in the finals!
Scorecard ▶️ https://t.co/ZaeuZQqC3Y #MPvBEN pic.twitter.com/pOWkc1gD41
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 12, 2023
मध्य प्रदेशच्या रजत पाटीदर वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला यशस्वी खेळी करता आली नाही. पाटीदारने अर्धशतक फटकावताना 52 धावा केल्या. बंगालकडून प्रदीप्ता प्रामाणिकने 5 गडी बाद केले. या सामन्यात मध्य प्रदेशचा पहिला डाव निचांकी धावसंख्येत गुंडाळताना आकाश दीपने 5 बळी घेतले होते. त्याने दुसऱ्या डावात एक गडी बाद केला. तोच या सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक –
बंगाल पहिला डाव – 438. मध्य प्रदेश पहिला डाव – 170. बंगाल दुसरा डाव – 119.4 षटकांत सर्वबाद 279 धावा. (अनुस्तुप मुजुमदार 80, प्रदीप्ता प्रामाणिक 60, सुदीप कुमार घरामी 41, सारांश जैन 6-103, कुमार कार्तिकेय 3-63). मध्य प्रदेश दुसरा डाव – 39.5 षटकांत सर्वबाद 241 धावा. (रजत पाटीदार 52, प्रदीप्त प्रामाणिक 5-51, मुकेश कुमार 2-35).