मुंबई – आपल्या सर्वाना हसवणारे सतीश कौशिक यांनी कायमचा निरोप घेतला. सतीश कौशिक 66 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नी आणि 11 वर्षांच्या मुलीसाठी हा कठीण काळ आहे. बेस्ट फ्रेंड अनुपम खेर आणि अनिल कपूर दु:खी आहेत. दोघांचेही डोळे पाणावले आहे. सतीशच्या अशा जाण्याने दोघेही दुखावले आहेत.
सतीश कौशिक यांच्यासाठी असे म्हटले जाते की, ते एक आनंदी व्यक्ती होते. तसेच त्यांनी 100 हून अधिक चित्रपट केले. सतीश यांनी विनोदी भूमिका केल्या ही वेगळी गोष्ट आहे, पण काळानुसार व्यक्तिरेखा बदलत गेल्याने अभिनेत्याच्या व्यक्तिरेखाही बदलत गेल्या. गंभीर भूमिकांमधून सतीश यांनी वडील, भाऊ, वकील अशा कितीतरी व्यक्तिरेखांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारली, ज्यांना पाहून सर्वांनीच त्याचे कौतुक केले. सतीश भलेही सहाय्यक भूमिकेत दिसले, पण चित्रपटांमधील त्यांची भूमिका नेहमीच प्रेक्षकांना आवडत असे…
सतीशचा शेवटचा चित्रपट
सतीश कौशिक नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘छत्रीवाली’ या चित्रपटात दिसले होते. सतीश यांनी रतन लांबाची कॉमिक व्यक्तिरेखा साकारली होती. सतीश यांचा आणखी एक चित्रपट बाकी आहे जो अजून प्रेक्षकांमध्ये प्रदर्शित व्हायचा आहे. तो म्हणजे कंगना राणावतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट. हा चित्रपट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील १९७५-७६ मध्ये भारतातील आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात सतीश शेवटच्या वेळी दिसणार आहे. या चित्रपटात सतीश संरक्षण मंत्री जगजीवन राम यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.