पुसेगाव – खटाव तालुकयातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते गणेश भोसले कार्यकर्त्यांसह लवकरच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार आहेत. याबाबत कार्यकर्ते तसेच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक चळवळीत काम करणारे असंख्य कार्यकर्ते यांची वडूज येथे गणेश भोसले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये सर्वानुमते गणेश भोसले यांच्य नेतृत्वाखाली लवकरच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. यापुढे बाबासाहेबांचे नातु व श्रध्येय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितांच्या लढ्यात पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे जाहीर केले .
पँथर ग्रुपचे अध्यक्ष भगवान मोरे म्हणाले, प्रत्येक अडचणीच्या वेळी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. लवकरच प्रवेशाचा कार्यक्रम वडूज येथे होईल. यावेळी बाबासाहेब निकाळजे, अजय मदने, सचिन शिंदे, शंकर येवले, जितू सोनवले, गणेश यादव, आनंदराव पवार, मिलिंद निकाळजे, युवराज रणदिवे, अभिजित बोकडे, विशाल उमापे, गणेश निकम, संतोष बरकडे, संदीप काळे, सुनील मिसाळ, शिवलिंग शिखरे, प्रकाश बनसोडे, अक्षय घाडगे, भिमसैनिक उपस्थित होते.