कोरेगाव – कोरेगाव मतदारसंघातील युवाशक्तीला विकासाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. युवाशक्ती बळकट झाल्यास गावे आणि पर्यायाने देश बळकट होईल, असा विश्वास आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आणि जिहे, ता. सातारा येथील रहिवासी सौरभ भोईटे यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आमदार शिंदे यांच्या गटात खटाव येथील निवासस्थानी प्रवेश केला. त्यावेळी आमदार शिंदे बोलत होते.
ते म्हणाले, मतदारसंघातील प्रत्येक गावात ठोस आणि दर्जेदार विकासकामे केली आहेत. विकासाच्या प्रवाहात येण्याचा सौरभ भोईटे यांचा निर्णय स्तुत्य आहे. त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मानसन्मान दिला जाईल. भोईटे म्हणाले, आमदार महेश शिंदे यांच्या कामाची पद्धत पाहून, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिहे येथील युवा नेते विक्रमसिंह फडतरे, सोसायटीचे चेअरमन संजय फडतरे, माजी सरपंच अजित फडतरे, उपसरपंच बजरंग फडतरे, आनंदराव भोईटे, आरोग्य कक्षाचे प्रमुख संदीप फणसे, प्रशांत फडतरे, सुधाकर फडतरे, विलास फडतरे, हणमंत गोरे, अंकुश फडतरे, हणमंत फडतरे, बापूराव फडतरे, पै. सतपाल फडतरे, बाळासाहेब फडतरे फडतरे, सूरज फडतरे, नितीन देवगुडे, आदेश फडतरे, सूरज भोसले, सागर फडतरे, गणेश फडतरे, ह. भ. प. हणमंत माने, जगन्नाथ फडतरे उपस्थित होते.
जिहेत विकासकामे मंजूर
आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नातून जिहे येथे जिहे स्टँड ते कठापूर दरम्यान कृष्णा नदीवरील पूल (सव्वातीन कोटी), हायस्कूल ते माळीनगर रस्ता (दोन कोटी), गावातील रस्ते व पार चौक सुशोभिकरण (अडीच कोटी), देशमुख आळीत पेव्हर ब्लॉक (20 लाख), बौद्ध विहार (15 लाख), जनसुविधेतून स्टँड वसाहत रस्ता काँक्रिटीकरण (15 लाख) ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. आजी-माजी सैनिक संघटनेच्या संकुलासाठी 25 लाखांच्या निधीस तत्त्वतः मंजुरी मिळाली आहे. गावात विजेचे 13 खांब आणि 100 केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत.