विडणी – विडणी, ता. फलटण गावचे सरपंच सागर अभंग व अवर सचिव धीरज अभंग यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली.
आपला संकल्प विकसित भारत या कार्यक्रमानिमित्त विडणी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आले होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर विडणी गावचा सर्वागीण विकास करुन गावातील सर्व सामान्य लोकांपर्यंत विविध योजना पोहोचवणारे सरपंच सागर अभंग यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी मंत्री मिश्रा व खा. रणजितसिंह यांचे अभंग परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.