सातारा – जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती कार्यालय कॉर्नर या दरम्यान बेशिस्त वाहनचालकांवर मंगळवारी कारवाई करून, सातारा शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने साडेबारा हजार रुपयांचा दंड वसूल के ला. यामध्ये परवाना नसताना गाडी चालवणे, नंबर प्लेट नसणे, फॅन्सी नंबर प्लेट लावणे, नो एंट्रीमध्ये जाणे यासारख्या क लमांन्वये 25 वाहनचालकांना दंड करण्यात आला.
सातारा शहरातील वाहतुकीच्या नियमनासाठी पोलिसांनी वाहनचालकांचे प्रबोधन आणि दंडात्मक कारवाई, असा दुहेरी मार्ग अवलंबला आहे. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव हे वेगवेगळे प्रयोग करत आहेत. वाहतूक शाखेने सोमवारी बढीये पेट्रोल पंप परिसरात 20 वाहनचालकांवर कारवाई केली होती. त्यानंतर मंगळवारी फोडजाई मंदिर प रिसरात पोलिसांनी वाहनांची तपासणी केली. यामध्ये दुचाकीस्वारांना विशेष लक्ष्य करण्यात आले.
पंचायत समितीच्या प्रवेशदाराजवळ ग्रेड सेपरेटरची एक मार्गिका खुली होते. काही वाहनचालक पंचायत समितीकडून विरुद्ध दिशेने नो एंट्रीमध्ये शिरत असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते. हे लक्षात घेऊन वाहतूक शाखेने तेथे वाहनांची तपासणी के ली. यावेळी 25 वाहनचालकांना प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे दंड करण्यात आला. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. शहरात वाहतूक कोंडी होईल, असे वर्तन करता कामा नये. वाहतूक शाखेने प्रबोधन आणि दंडात्मक क ारवाई असे दोन्ही पर्याय ठेवले आहेत. वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक शाखा सतर्क असून, यापुढेदेखील ही मोहीम सुरू राहणार असल्याचे अभिजित यादव यांनी सांगितले.