कळंब – वालचंदनगर परिसरात संविधान दिन उत्साहात
इंदापूर – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अविरत परिश्रम घेऊन आपल्या देशाला संविधान दिले. खर्या अर्थाने संविधानामुळेच आपल्याला समानतेचे हक्क-अधिकार आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे आजचा संविधान दिन म्हणजे हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या अखंड देशवासीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
कळंब – वालचंदनगर परिसरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाचे औचित्य साधून कळंब ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाचनालयाचा भूमिपूजन पार पडले. तसेच 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सुहास डोंबाळे, रामचंद्र कदम, सरपंच विद्या अतुल सावंत, राजेंद्र डोंबाळे, योगेश डोंबाळे, संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
वालचंदनगर येथे सुद्धा भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साद फाउंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्ट (एनजीओ)च्या वतीने संविधान सन्मान दौडचे आयोजन आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नम्रता तळेकर, विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य अहिरे,
वर्धमान विद्यालयाचे उपप्राचार्य निकम, उबाळे सर, वालचंदनगर चे सरपंच कुमार गायकवाड, उपसरपंच रोहित झेंडे, वालचंद विद्यालयाचे प्राचार्य सर्वंगोड, भारत चिल्ड्रन्स अॅकडमीचे प्राचार्य क्षीरसागर, व्होकेशनल एज्युकेशन लासुर्णेचे सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दयानंद झेंडे, माजी उपसरपंच हर्षवर्धन गायकवाड, वालचंदनगर ग्रामपंचायत सदस्य पांढरे, राष्ट्रवादीचे गणेश धांडोरे, आकाश पवार, रवि जाधव, वर्धमान विद्यालयाचे भोरे, ज्योत्स्ना गायकवाड, कळंबच्या पोलीस पाटील, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे गोपनीय विनोद पवार व अनेक शाळांचे शिक्षक उपस्थित होते.