वाठार स्टेशन – देऊर, ता. कोरेगाव येथून काल (दि. 30 नोव्हेंबर) रात्री दोन मोटारसायकलींची चोरी झाली. याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. देऊर येथील विशाल बाळासाहेब कदम (वय 40) यांनी घराच्या मागे हँडल लॉक लावून उभी केलेली 20 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल आणि दीपक सुभाष करपे यांची 15 हजार किमतीची हिरो मोटारसायकल चोरीस गेल्याच्या फिर्यादी नोंदवण्यात आल्या असून, पोलीस नाईक भोसले तपास करत आहेत.