कार्ला – पुणे सीकेपी फॅमिली पब्लिक ट्रस्ट व चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीचा ‘एक दिवस कायस्थांचा, एकवीरा देवी पालखी सोहळ्याचा’ कार्ला गडावर मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी हजेरी लावली.
या सोहळ्यात सुमारे ३०० समाज बांधवांनी सोहळ्याचा आनंद घेतला. पहाटेच्या अभिषेक पासून सोहळ्यास सुरूवात झाली. त्यानंतर होम, हवन, पालखी, गोंधळ, आरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. समाज बांधवांनी एकत्र येऊन संपर्क, सहवास आणि समन्वय असा त्रिवेणी संगम झालेला पहावयास मिळाला.
संयोजन समितीत स्वप्नील प्रधान, जयदीप कोर्डे, माणिक गडकरी, गजेंद्र गडकरी, मिलिंद मथुरे, वृंदा मथुरे, सागरिका, संजोग कर्णिक, पुष्कर गुप्ते, संजना गुप्ते, भूषण देशपांडे, मंदार कुळकर्णी, नीलेश गुप्ते, चिन्मय चौबळ, सुविज्ञ गुप्ते, प्रतिक मथुरे, पायल मथुरे, विवेक पाटणकर, संकेत कर्णिक, प्रकाश गुप्ते, नताशा कारखानीस, गौरी मथुरे, ईशा दिघे, अशोक कुळकर्णी, प्रसाद मथुरे, भूषण देशपांडे, नागेश देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली, अशी माहिती सिकेपी उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष विकास देशमुख दिली.