सातारा – महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ५७ वी ज्युनिअर राज्य कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धा दि. ७ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड हॉल, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दि. ३ जानेवारीपर्यंत जिल्हा ॲम्युचर कॅरम असोसिएशनमार्फत नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती सातारा जिल्हा ॲम्युचर कॅरम असोसिएशनचे सचिव सुनिल चतूर यांनी दिली.
या स्पर्धेसाठी सातारा जिल्हा ॲम्युचर कॅरम असोसिएशनच्या वतीने मंगळवार दि. २ जानेवारी रोजी आदित्य स्पोर्ट्स कॅरम क्लब,सदर बाजार सातारा येथे खेळाडू निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पात्र खेळाडूंची नोंदणी ज्युनिअर राज्य कॅरम चॅम्पियनशिप २०२३-२४ साठी पाठविण्यात येणार आहे. भाग घेणाऱ्या इच्छूक खेळाडूंनी मंगळवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता या निवड चाचणी स्पर्धेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सुनिल चतूर यांनी केले आहे.