वडूज – मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना महिला आणि एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प खटाव 1/2 यांच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत जन्मानंतर मुलीला पाच हजार, इयत्ता पहिलीत सहा हजार, इयत्ता सहावीत सात हजार, इयत्ता 11 वीत आठ हजार आणि वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे. पात्र लाभार्थ्यांनी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालय, पंचाय समिती, वडूज येथे संपर्क साधावा.