सातारा: गांजा शेतीप्रकरणी जर्मन नागरिकांना पोलीस कोठडी

वाई  – वाई येथील बंगल्यात गांजाची शेती करणाऱ्या दोन जर्मन नागरिकांना पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना शनिवार, दि. 20 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत सविस्तर वृत्त असे, वाईनजीक यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नंदनवन सोसायटीतील “विष्णू श्री स्मृती’ या बंगल्यात परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या घराची तपासणी केली असता, घरात व गच्चीवर गांजाची लागवड केल्याचे आढळले.

अधिक तपासणीसाठी पुण्याहून फॉरेन्सिक लॅबच्या लोकांना वाई येथे पाचारण करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर पंचनामा करून अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आणि घराचा पंचनामा करून ते सील करण्यात आले.

यावेळी सुमारे आठ लाख 21 हजार रुपयांचा 29 किलो गांजा व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. गांजा उत्पादन करणाऱ्या सर्गीस व्हिक्‍टर मानका (वय 31) व सेबेस्टियन स्टेनमुलर (वय 25) यांना पोलिसांनी अटक केली होती.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.