सातारा (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानांच्या वेळेत बुधवारपासून (दि. २२) बदल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
या अत्यावश्यक अत्यावश्यक बाबी सुरू ठेवण्याच्या वेळा पुढीलप्रमाणे
- किराणा, धान्य दुकाने,मिलिट्री कॅन्टीन, डिमार्ट व दुध- सकाळी 9 ते दुपारी 2.
- स्वस्त धान्य दुकाने-दिवसभर.
- भाजीपाला दुकान-सकाळी 9 ते दुपारी 2, घरपोच भाजीपाला व किराणा माल – सकाळी 9 ते दुपारी 2,
- न शिजवलेले मटण, चिकन व मासे विक्री (फक्त घरपोच सेवा)- सकाळी 9 ते दुपारी 2.
- खासगी हॉस्पीटल/ खासगी डॉक्टरांची सेवा- दिवसभर.
- औषधे दुकाने- सकाळी 9 ते दुपारी 2, हॉस्पीटलमधील औषधे दुकाने- सकाळी 9 ते दुपारी 2, हॉस्पीटलमधील पेशंटसाठी कायस्वरुपी खुले.
- पेट्रोल व डिझेल पंप- सकाळी 9 ते दुपारी 2, ॲम्ब्युलन्ससाठी कायमस्वरुपी खुले.
- एलपीजी गॅस पुरवठा- दिवसभर
- सर्व शासकीय कार्यालये, ग्रामीण, नागरी भागातील सर्व पोस्ट कार्यालये/ एम.एस.ई.बी/दुरसंचार विभाग इ. शासकीय कार्यालये (सुट्टीचा दिवस वगळता)- दिवसभरासाठी सुरू राहतील.
- राष्ट्रीयीकृत व्यावसायिक बँका, ग्रामीण, नागरी भागातील खाजगी /राष्ट्रीयीकृत बँका/ विविध कार्यकारी सोसायट्या/ विविध पतसंस्था (सुट्टीचा दिवस वगळता)- सकाळी 9 ते दुपारी 2.
- प्रसार माध्यमांची अधिकृत कार्यालये- दिवसभर.
- पेपर विक्री व्यवसाय दुकाने-पेपर वितरण सकाळी 9 पुर्वी आणि पेपर स्टॉल सकाळी 9 ते दुपारी 2.
- खते,बियाणे / औषधे /कृषी यंत्रे/औजारे/ट्रॅक्टर उपकरणे व त्यांची दुरुस्ती / स्पेअरपार्ट / स्पे पंप/ सिंचन साहित्य / पाईप/ ठिबक / तुषार सिंचन / शेततळे अस्तरीकरण कागद इत्यादीसंबंधी दुकाने व दुरस्ती- सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.