वाठार स्टेशन (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील करोना पॉझिटिव्ह महिलेचे बनवडी कनेक्शन उघड झाल्यावर या गावात प्रशासनाने आता ‘हाय अलर्ट’ जारी करून आठ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. हे आठही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बनवडी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
कोल्हापूरची करोना बाधित महिला ज्या घरात पाच दिवस राहिली, त्या कुटुंबातील आठ सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये त्यांचा स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. हे आठही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ग्रामस्थांनी सोशल डिस्टन्स पाळून योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.