प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी – जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी
कोपरगाव प्रतिनिधी (अहमदनगर) : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती व्यकी राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता हे संकट जास्त वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कायद्याचे पालन करावे, असे ते म्हणाले.
कोपरगाव येथील बाधित महिलेला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे तिला तपासणीसाठी कोपरगाव येथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तिच्या घशातील स्त्राव नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. आज अहवाल प्राप्त झाला त्यात ही महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. मात्र, ही महिला अद्याप कोणत्याही बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झालेले नाही तसेच या महिलेने, तिने कुठेही प्रवास केला नसल्याची माहिती दिली आहे.
ही महिला कोणाच्या संपर्कात आली होती, याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून घेतली जात आहे.परंतु बाधित महिलेचा मुलगा पुणे येथे राहायला असलयबे तो पुणे येथून आल्याने त्याला निमोनियचे लक्षणे आढळून आली होती त्यावर निमोनियचे उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिलेण्यात अली हाती सध्या तरी त्याला कोणाची बाधा झाली नसली तरी झाली नसली तरी एकाच घरात एकाच दारात बाधित करुणा बाधित होण्याची शक्यता निष्पन्न होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तवली जात आहे. दरम्यान या महीलेच्या संपर्कात कोणकोण आले आहेत याचा शोध घेतला जात आहे.