एकूण बळी तीनशेपार
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात करोनाच्या धडाका सुरुच असून रविवारी एकाच दिवसात आजपर्यंतचे उच्चांकी म्हणजे ४४३ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १०१५७ झाली आहे.
करोनामुळे रविवारी दहा रुग्णांचा म्रुत्यू झाला. त्यामुळे करोनाच्या एकूण बळींची संख्या ३०६ झाली आहे. रविवारी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील उद्या सकाळी मिळेल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.