सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (बुधवार, दि. 10) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये तीन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, आणखी 152 नागरिकांच्या करोना चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली. जिल्ह्यात गेल्या महिन्या-दोन महिन्यांपासून बाधितांची संख्या वाढत असताना, करोनाबळी रोखण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे, ही चिंतेची बाब आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मलवडी, ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, पुसेगाव, ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मलकापूर, ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष, अशा तीन बाधितांचा मृत्यू झाला.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात शाहूपुरी चार, सदरबझार दोन, पंताचा गोट, करंजे, मतकर कॉलनी प्रत्येकी एक, इतरत्र तीन, खेड तीन, कृष्णानगर दोन, विकासनगर, जैतापूर, महागाव, शिवथर, कोडोली प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात शनिवार पेठ चार, गुरुवार पेठ तीन, इतरत्र आठ, कोयना वसाहत तीन, कुंभारगाव, पार्ले, हिंगोले, तळबीड, नांदलापूर प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात अडुळ दोन, पाटण एक,
फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात हडको सहा, लक्ष्मीनगर तीन, रविवार पेठ एक, विडणी पाच, तरडगाव तीन, घाडगेवाडी दोन, खराडेवाडी, आदर्की, वाठार निंबाळकर, निंभोरे, गिरवी, जाधववाडी, पिंप्रद, गुणवरे प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात बुध पाच, पुसेगाव चार, मायणी, नेर, वडूज, तडवळे प्रत्येकी दोन, मुळीकवाडी, अनपटवाडी, राजापूर, एनकूळ, शिंदेवाडी प्रत्येकी एक, माण तालुक्यात म्हसवड चार, दहिवडी तीन, घाटेवाडी एक,
कोरेगाव तालुक्यात देऊर नऊ, आझादपूर पाच, सर्कलवाडी तीन, कोरेगाव, रेवडी प्रत्येकी दोन, अपशिंगे, पिंपरे बुद्रुक, सुर्ली प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात लोणंद तीन, खंडाळा दोन, हरळी, शिरवळ प्रत्येकी एक, वाई तालुक्यात वाई शहर पाच, मेणवली, कणूर, किकली, ओझर्डे प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात दांडेघर, पाचगणी प्रत्येकी एक,
जावळी तालुक्यात रानगेघर एक, इतर दोन, बाहेरील जिल्ह्यामधील मुंबई, बंगळुरू, पुणे प्रत्येकी एक, असे एकूण 152 नागरिक नव्याने बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1868, तर बाधितांची एकूण संख्या 60 हजार 317 झाली आहे.