#Corona : केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेली माहिती महाराष्ट्रासाठी अत्यंत ‘चिंताजनक’

नवी दिल्ली – देशातील काही राज्यांत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात करोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी आज पत्रकार परिषद घेत देशभरातील करोना परिस्थिती संदर्भात माहिती दिली आहे.

या पत्रकार परिषदेत जी माहिती समोर आली आहे ती महाराष्ट्रासाठी चिंताजनक आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण असलेल्या टॉप 10 जिल्ह्यांत महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश आहे.

पुणे – 18,474
नागपूर – 12,724
ठाणे – 10,460
मुंबई – 9,973
अमरावती – 5,259
जळगाव – 5,029
नाशिक – 4,525
औरंगाबाद – 4,354

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.