पाचगणी – (सादिक सय्यद) मेढा नगरपंचायत हद्दीमधील चांदणी चैाक ते हैादापर्यतचे बांधकाम करणाऱ्या सह्याद्री कन्स्ट्रक्शन्स कंपनीला निकृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी मेढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अमोल पवार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार काळ्या यादीत टाकत सह्याद्री कन्सट्रकशन्सची अनामत रक्कम जप्त केली.
मेढा नगरपंचायतच्या या निकृष्ट कामाबाबत नगरसेविका गैारी पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहर उपाध्यक्ष इम्रान आतार, शिवसेना शहर प्रमुख सचिन जवळ, शिवसेना नेते सचिन करंजेकर, तसेच राष्ट्रवादीचे मुख्य सचिव धनंजय पवार यांनी या कामाबाबत जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांच्याकडे निकृष्ट कामाबाबत तक्रारींचा तगादा लावला होता.
अभिजीत बापट यांनी निकृष्ट कामाची चैाकशी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकारी अमोल पवार यांना दिले होते. अमोल पवार यांनी सखोल चैाकशी करुन सह्याद्री कन्स्ट्रक्शन्स या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या व अनामत रक्कम जप्त केली असल्याचा अहवाल अभिजीत बापट यांना देण्यात आला आहे.