मायणी – मायणी, ता. खटाव येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे बुधवार, दि. 20 ते बुधवार दि.27 या कालावधीत श्री दत्त जयंती नामजप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने दि. 20 रोजी मंडल स्थापना, अग्नि स्थापना, स्थापित देवता हवन, गुरुचरित्र वाचन होणार आहेत. तर दि.21 रोजी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, मनोबोधन. दि. 22 रोजी नित्य स्वाहाकार, श्री गीताई याग, दि. 23 रोजी नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग,
दि. 24 रोजी नित्य स्वाहाकार, चंडी याग, दि. 25 रोजी नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, दि. 26 रोजी नित्य स्वाहाकार,बलि पूर्णाहुती व दु. 12 वाजून 39 मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव. दि. 27 रोजी श्री सत्यदत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह सांगता होणार आहे.
या निमित्ताने सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे-सकाळी आठ- भूपाळी आरती,
आठ पंधरा- नित्य स्वाहाकार, आठ तीस ते दहा गुरुचरित्र वाचन, दहा तीस महानैवैद्य आरती, स. दहा पंचेचाळीस विशेष याग, दुपारी दोन ते पाच श्री दुर्गा सप्तशती व श्री स्वामी चरित्र पाठ वाचन, सायंकाळी पाच तीस औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी सहा महानैवैद्य आरती, सायंकाळी सहा तीस विविध विषयावर मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.