सातारा – दोन दिवसांपूर्वी लाच प्रकरणी अटक झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) पथकातील वरिष्ठ सहाय्यक हेमंत विठोबा हांगे यास शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी निलंबित केले आहे.
भविष्य निर्वाह निधीचे खाते सातारा जिल्हा परिषदेतून सांगली जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा आदेश काढण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकाकडून तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना भविष्य निर्वाह निधी (माध्यमिक) पथकातील वरिष्ठ सहाय्यक हेमंत हांगे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
या कारवाईमुळे संबंधित कार्यालयाची बदनामी झाली होती. या कारवाइत हांगे यांच्यावर अटकेची कारवाई झाली होती. याबाबत शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे अहवाल देण्यात आला होता. त्यानुसार हेमंत हांगे यास निलंबित करण्यात आले आहे.