राहुरी – राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने आज दोन गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन काडतुसे व चौदाशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त केला. दोघांना पोलिसांनी अटक केली. जॉन कॅसिनो परेरा (वय 36) व अब्दुल वाहत सय्यद साबीर (वय 31 ,दोघे रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही कारवाई केली.
पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव , विकास साळवे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख , प्रमोद ढाकणे, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, प्रवीण बागुल, गोवर्धन कदम व आजिनाथ पाखरे यांनी ही कारवाई केली जॉन कॅसिनो परेरा व अब्दुल वाहत सय्यद साबीर यांनी देशी बनावटीचे पिस्तूल व तीन काडतूसे, गाडी (एम एच 16-56 13)च्या डिक्कीमध्ये त्यांनी हे पिस्तूल, काडतुसे व गांजा लपवला होता.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी हे दोघे आल्याची गुप्त खबर राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली. यात मोपेड गाडी, पिस्तूल, काडतुसे, गांजा असा एक लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर कोतवाली पोलीस स्टेशन, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनवर चार गुन्हे दाखल आहेत.