भुईंज – लगडवाडी, ता. वाई येथील पतीस मारहाण प्रकरणी पत्नीसह सहा जणांवर भुईंज पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. २८ रोजी लगडवाडी ते लोणंद प्रवासा दरम्यान किरण भिलारे, सोमनाथ भिलारे, संभाजी भिलारे, सोन्या ( पूर्ण नाव माहीत नाही ), गणेश भिलारे, प्रथमेश भिलारे, नीलम घाडगे (सर्व रा. लोणंद) यांनी जबरदस्तीने घरात घुसून शुभम घाडगे यांना त्यांचे पत्नी बर पटत नसल्याने सोडचिठ्ठी देण्या आधी दुसरे लग्न का करतोयस असे म्हणत गिझरने, कुऱ्हाडीचा तुंब्याने, बुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाण करून घरामधून बाहेर आणून कारमध्ये बसवून शिरगाव गावचा घाटातील घाटमाथ्यावर नेले. तेथे हॉटेलच्या समोर गाडी उभी करून पुन्हा मारहाण केली. तसेच फिर्यादी शुभम घाडगे यांना दारू देखील पाजली. त्यानंतर वाठार मार्गे लोणंद येथील मेहुण्याच्या घरी नेऊन घाडगे यांना त्याच्या पत्नीने देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर मध्यरात्री तीन वाजता लोणंद येथील बस स्थानकात नेऊन सोडले.
याप्रकरणी सात जणांचा विरोधात शुभम घाडगे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. या गुन्हयाचा अधिक तपास हवालदार दगडे करत आहेत.