सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता 53 हजार 83 इतकी झाली आहे.
या करोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सातारा तालुका ः सातारा 3, कोडोली 5, सांबरवाडी 3, शनिवार पेठ, सदरबझार, शाहुनगर प्रत्येकी 2, प्रतापगंज पेठ, पिरवाडी, जळगाव, साबळेवाडी, आरळे प्रत्येकी 1.,
कराड तालुका ः मलकापूर 2, किवळ 1., पाटण तालुका ः बहुले 2, विहे, रासती, गरवडे प्रत्येकी 1.,
फलटण तालुका ः फलटण 3, वाठार निंबाळकर, धुळदेव, पिंपळवाडी प्रत्येकी 2, आदर्की बु, नांदल, साखरवाडी, आदर्की, तरडगाव, मुरुम, तावडी प्रत्येकी 1.,
खटाव तालुका ः वादुस, मोरवे, गणेशवाडी, खटाव प्रत्येकी 1., माण तालुका ः बिदाल, दहिवडी, म्हसवड प्रत्येकी 2, नरवणे, मोही, रांजणी, कुळकजाई, झाशी, मलवडी, पिंपरी प्रत्येकी 1.,
कोरेगाव तालुका ः वाठार किरोली 1., वाई तालुका ः देगाव, कळंबे, उडतारे, बोपेगाव प्रत्येकी 1. खंडाळा तालुका ः लोणंद 4, शिरवळ, अहिरे, सुखेड प्रत्येकी 1., इतर 1, वाठार 2, जुलेवाडी 1.
दरम्यान, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयातील 46 व आघारकरचे 8 अशा एकूण 54 रुग्णांची माहिती तांत्रिक कारणांमुळे उपलब्ध न झाल्याने या आकडेवारीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.