सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील पाच करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी बुधवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या 1753 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 176 रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. तर 386 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
लिंब ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, बोंबाळे ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष, गडकर आळी येथील 32 वर्षीय पुरुष, सुरुर ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतून आणि करोना केअर सेंटरमधून बुधवारी संध्याकाळपर्यंत 176 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर 386 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 3, कराड 9, फलटण 10, कोरेगाव 4, वाई 21, खंडाळा 7, रायगाव 57, पानमळेवाडी 106, महाबळेश्वर 19, पाटण 14, खावली 15, तळमावले 6, म्हसवड 25, तरडगाव 9 व कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 54 अशा एकूण 386 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
घेतलेले एकूण नमुने – 260687
एकूण बाधित — 53083
घरी सोडण्यात आलेले -50089
मृत्यू — 1753
उपचारार्थ रुग्ण — 1241