नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचनांनुसार करोना बाधितांच्या घरांवर “पॉझिटिव्ह’ अशी पोस्टर लावली जाऊ नयेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
केवळ काही ठराविक प्रकरणांमध्ये संबंधित प्रशसकीय यंत्रणेने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सूचना केल्यास अशी पोस्टर लावली जाऊ शकतील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
देशातील काही राज्यांमध्ये अशा प्रकारे पोस्टर चिकटवली जात आहेत. त्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने हे आदेश दिले आणि ही याचिका निकाली काढली.
केंद्र सरकारने कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामध्ये कोठेही अशाप्रकारे पोस्टर चिकटवण्याचे निर्देश नाहीत. त्यानुसार राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांनी अशाप्रकारे पोस्टर लावू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.