मांजरी – नुकत्याच गोवा येथील झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मांजरी खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील सार्थक समीर उंद्रे(वय.14,) याने 2 सुवर्णपदक आणि 1 रौप्य पदक पटकाविले.
सार्थकने या खेळात तामिळनाडू,अरुणाचल प्रदेश,उत्तराखंड आदी राज्यातील खेळाडूंना नामोहरम केले. त्याच्या या कामगिरीने मांजरी खुर्द गावाचे नाव देशात प्रसिद्ध झाले आणि
गावाच्या नावलौकितात आणखी भर पडला, या कामगिरीमुळे गावातील आणि पंचक्रोशीतील लोकांचा सार्थक वरती शुभेच्यांचा वर्षाव होत आहे.
सार्थक साठी विशेष मार्गदर्शन राष्ट्रीय चॅम्पियन अतुल सर घुले, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले आणि प्रशिक्षक गणेश बावकर यांचे खूप योगदान लाभले.