नाशिक – ऐकीकडे राज्यभरात दिवाळीसण साजरा केला जात आहे तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे बेहाल होताना दिसून येत आहे. राज्यातील एसटी कर्मचारी मोठ्या संकटातून जात आहे. गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या समोर येत आहेत. कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संप देखील पुकारला आहे. मात्र त्यामधूनसुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या पदरी काही पडले नाही. शेवटी हतबल कर्मचारी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसून येत आहे.
अशीच एक घटना नाशिक मधून समोर आली आहे. कळवण आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या कर्मचाऱ्याची वेऴेत रजा मंजून न झाल्यामुळे कमी पगार मिळाला. त्यामुळे या कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
प्रमोद सूर्यवंशी असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रमोद यांनी विष प्राशन केल्याचे नातेवाईकांना त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. प्रमोद यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कळवण आगारात असेलेल्या प्रमोद यांची आगारातून वेळेत रजा मंजूर न झाल्यामुळे त्यांना ऐन दिवाळीत दोन हजार रुपये पगार व अडीच हजार रुपये दिवाळी बोनस असे चार हजार पाचश रुपये प्रमोद यांना मिळाले. घरात आई व बायको आजारी असणाऱ्या प्रमोद यांना मोठे संकट आले. त्यामुळे मिळालेल्या पगारात दिवाळीत मुलांना कपडे घ्यायचे की आजारी आई व बायकोचे उपचार करायचा अशा दुहेरी संकटात प्रमोद सापडले. शेवटी त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.