साउथ स्टार विजय देवरकोंडा लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. विजय प्रोड्यूसर करण जोहरच्या आगामी “लायगर’मधून तो अनन्या पांडेसोबत डेब्यू करत आहे. याच दरम्यान विजयचा एक फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्यासोबत सारा अली खान दिसत आहे.
साराने नुकताच आपल्या इंस्टा स्टोरीवर विजय देवरकोंडा याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच साराने याला एक “फॅन मोमेंट’ असे संबोधले आहे. या फोटोत विजयने ग्रे कलरचा टी-शर्ट घातलेला आहे, तर सारा ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
साराने पहिल्यांदाच विजयची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून त्यावर असंख्य चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी सारा आणि विजय यांची जोडी परफेक्ट असल्याचेही म्हटले आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास “अर्जुन रेड्डी’ चित्रपटानंतर विजयला खूपच लोकप्रियता मिळाली. ज्यानंतर तो आता हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री करण्यास सज्ज झाला आहे. विजयचा “लायगर’ हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
दुसरीकडे साराचा “कुली नंबर 1′ हा चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तसेच ती “अतरंगी रे’मध्येही झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार, धनुष आणि निम्रत कौर मुख्य भूमिका साकारत आहे.