Entertainment : अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही जोडी पुन्हा एकदा ‘8 दोन 75’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी ही जोडी ‘काळे धंदे’ या चित्रपटात पाहायला मिळाली होती. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाचा टीजर 20 डिसेंबरला रिलीज झाला आहे. संस्कृती बालगुडेच्या या सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी’ हा चित्रपट 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
View this post on Instagram
देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा हा सिनेमा आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘8 दोन 75’ या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडेअश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, , शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे – विद्यासागर, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार ‘8 दोन 75’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
याशिवाय संस्कृती बालगुडे ‘आईच्या गावात मराठी बोल’ या सिनेमात देखील दिसणार आहे. या सिनेमात 3 इडियट्समधील चतुर म्हणजेच ओमी वैद्य देखील मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करणार आहे.